मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद घेत मोहित कंबोज (Mohit Kamboj), किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनतर मोहित कंबोज यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) मोहित कंबोज बुडवणार, पत्राचाळीचा मुद्दा आहे. ती जमीन खरेदी करणारा कंबोज आहे.

पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे तिथेच गुंतले आहेत. तिथं कंबोजचाच प्रोजेक्ट सुरु आहे असा गंभीर स्वरूपाचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Advertisement

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मोहित कंबोज यांनीही संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.

राऊतसाहेब हे मोदींपासून सुरु करतात ते फडणवीसांवर येऊन थांबतात. मागील पाच महिन्यात हे सरकार माझ्यासारख्या माणसासोबत लढून जिंकू शकले नाहीत असे म्हणत कंबोज यांनी राऊतांना चिमटा काढला आहे.

तसेच कंबोज पुढे म्हणाले, राऊतांनी सुरुवात केली की मोहित कंबोजला मी ओळखत नाही. ४ सप्टेंबर २०१७ ला राऊत माझ्या घरी आले होते. ते प्रत्येक वर्षी माझ्या घरी येतात.

Advertisement

मी सांगू इच्छित नाही पण जीवनात अनेक वेळा त्यांनी माझ्याकडे पैशाबाबत मदत मागितली आणि मी त्यांची मदतही केली, तसेच ‘माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की मला त्यांनी फडणवीसांसारख्या मोठ्या माणसाचा एक छोटा बॉय म्हटलं.

माझा राऊतांना सवाल आहे की ते उद्धव ठाकरे यांचे ब्ल्यॅू आईड बॉय आहेत की शरद पवार यांचे? संजय राऊत यांनी आपली लॉयल्टी कुणाशी आहे ते आधी स्पष्ट करावे असे म्हणत मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Advertisement