पुणे : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात भाजप (BJP)  शिवसेना वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. आरोप प्रत्यारोपाचे तसेच टीकेचे सत्र सुरूच आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या आणि भाजपवर जोरदार हल्ला केला होता.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात सध्या जे काही चालले आहे त्याबाबत ॲक्शन ला रिॲक्शन होतच राहणार असे म्हणावे लागेल. सगळ्यांना कुणीतरी अधिकारवाणीने सांगू शकेल अशी अराजकीय व्यक्ती राहिलेली नाही.

Advertisement

अशावेळी मुख्यमंत्र्यांची मोठी जबाबदारी असते. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवावे, पण ते कसे बोलावणार? त्याचबरोबर संजय राऊत यांनी ‘मातोश्री’ डळमळीत करायची आहे का?

ते कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हे सगळ्यांना माहिती आहे. सगळा चिवडा झाला आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की सामनाचा संपादक बदलण्याची गरज आहे. सामनामध्ये कशी भाषा वापरली जाते ते आपण पाहतोच. रश्मी वहिनी सामनाच्या संपादक आहेत.

Advertisement

त्यांना बदला आणि अनिल परब (Anil Parab) यांना संपादक करा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिलाय.

इतकंच नाही तर महाविकास आघाडीचे जे सर्वेसर्वा आहेत ते काँग्रेस आणि शिवसेनेला कटपुतळीप्रमाणे नाचवत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरही (Sharad Pawar) टीका करण्याची संधी सोडली नाही.

Advertisement