राज्यात उसाखालील क्षेत्र वाढल्याने १९ कोटी ऊस उपलब्ध असेल. त्यामुळे राज्यात एक कोटी १२ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.

१९ कोटी टन ऊस उपलब्ध
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ग्राहक संरक्षण मंत्रालयास याबाबत एक पत्र लिहिले आहे. 2021-22 च्या गाळप हंगामात राज्यात 12.32 लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल, असा अंदाज त्यांनी पत्रात व्यक्त केला आहे.

येत्या हंगामात १९ कोटी साठ लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा एक कोटी 12 लाख टन उसाचे गाळप होऊन झालेल्या एक कोटी सहा लाख टनाचा पूर्वीचा साखर उत्पादनाचा विक्रम मोडीत निघेल.

Advertisement

अनेक कारखाने बंद राहण्याची शक्यता
आगामी हंगामात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यात येणार आहे. राज्याचा साखर उतारा 10.21 टक्के राहण्याची शक्यता हे. राज्यात स्थापित असलेल्या 245 साखर कारखान्यांपैकी अनेक कारखाने आर्थिक ओझ्यामुळे सुरू होण्याची शक्यता नाही.

१९२ कारखाने सुरू होणार
येत्या हंगामात साधारण 192 कारखाने सुरू होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात 190 कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) मते, निधीची तरलता राखून ठेवण्यासाठी कारखान्यांना आर्थिक दबावाखाली कमी किमतीत सध्या साखर विकावी लागत आहे. त्यामुळे अनेक कारखाने निश्चित केलेली एफआरपी देऊ शकत नाहीत.

Advertisement