file photo

पुणे : महाराष्ट्राची किनारपट्टी ते कर्नाटकाची किनारपट्टीदरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याची द्रोणीय स्थिती आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

कमी दाबाच्या पट्याचे चक्रीवादळात रुपांतर शक्य

गेल्या आठवड्यापासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी असला, तरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. खानदेश, मराठवाडा व विदर्भात पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत.

Advertisement

अरबी समुद्राच्या उत्तर भाग ते आंध्र प्रदेशचा किनारपट्टी दरम्यान पूर्व – पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचे रूपांतर चक्रीय वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता असून, हा पट्टा उत्तर महाराष्ट्र आणि तेलंगणापर्यंत आहे.

हा पट्टा समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. ही स्थिती कोकणातील जोरदार पावसासाठी पोषक ठरत असल्याने अनेक भागांत पाऊस पडत आहे.

तापमानात कमालीची घट

मध्य महाराष्ट्र, खानदेश मराठवाडा व विदर्भाच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत आहे.

Advertisement

ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात किंचित घट झाली आहे.

येथे होणार जोरदार पाऊस :

  • सोमवार ः संपूर्ण कोकण, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, वाशीम, अमरावती, नागपूर, यवतमाळ,
  • मंगळवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, भंडारा, नागपूर
  • बुधवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम
  • गुरुवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया