कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली दस्त नोंदणी आता सुरू झाली आहे. त्यामुळे घर खरेदीकरांना दिलासा मिळाला आहे.

शास्ती कमी करण्याचा निर्णय

कोरोनामुळे उद्भलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे एप्रिल व मे महिन्यात टाळेबंदी लागली. या काळात दस्त नोंदणीदेखील बंद राहिली. त्यामुळे निश्चित कालावधीत दस्तांची नोंदणी झाली नाही.

विशेष म्हणजे दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती एक हजार रुपये करण्यात आली आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी दि. पं. पाटील यांनी एका पसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

या निर्णयामुळे नोंद न झालेल्या दस्तांवर देय होणारी शास्ती महाराष्ट्र नोंदणी नियम 27 च्या प्रचलित तरतुदीप्रमाणे डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादीत अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील 36 (4) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यासाठी तर जानेवारी 2021 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादित दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करून ती एक हजार रुपये करण्यात आली.

पुणे जिल्हयांत सर्वंत्र नोंदणी

या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2/ दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये दस्त नोंदणी व कार्यालयीन कामकाजासाठी सुरू ठेवण्यात येत आहे.

इथे होईल दस्त नोंदणी

सह दुय्यम निबंधक बारामती, बारामती क्र.2, दुय्यम निबंधक कार्यालय, आंबेगाव, भोर, दौंड, इंदापूर, नारायणगाव, केडगाव, खेड, खेड क्र. 2, खेड क्र. 3, लोणावळा, मावळ, मावळ क्र.2, मुळशी, मुळशी क्र.2, जुन्नर, पुरंदर, शिरूर, तळेगाव ढमढेरे, वेल्हा हे कार्यालय सुरू राहणार आहेत.