‘ईडी’ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची साडेतीनशे कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्यांनतरही आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत.

त्यामुळं देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत आहे. आता देशमुख यांच्या विदर्भातील निवासस्थानी ‘ईडी’ने पुन्हा छापे टाकले आहेत.

इथं टाकले छापे

देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापा टाकला आहे. यामध्ये आता काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

काटोल नरखेड तालुक्यातील वडाळी वडाविहिरा इथं देशमुख यांची वडिलोपार्जित काही जागा आहे, घरं आहेत, यावर अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून इथे सर्च मोहीम सुरू आहे.

स्थावर मालमत्ता जप्त

याआधीही अंमलबजावणी संचालनालयाने ‘ईडी’ने देशमुख यांच्याविरूद्ध मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाची साडेतीनशे कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

देशमुख यांच्याविरूद्ध ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या संपत्तीत मुंबईतील सुमारे सव्वा कोटी रुपयांचा फ्लॅट आणि रायगडमधील अडीच कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश आहे.

मुलगा आणि पत्नीलाही समन्स

‘ईडी’ने देशमुख यांना तीन समन्स पाठवले होते; परंतु ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्याची सुनावणी अद्यापही बाकी आहे. ‘ईडी’ने देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश आणि पत्नीलाही समन्स बजावले होते. हे दोघेही तपास यंत्रणेसमोर आले नव्हते.