दहावीतील १६ लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले असताना पाच हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून टेवण्यात आल्यानं त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली.

निकाल का ठेवले राखून ?

राज्यातील 4922 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन गुण पाठवले नसल्यानं त्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे.

Advertisement

कोकण विभागाचा सर्वाधिक शंभर टक्के निकाल लागला असून सर्वांत कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. नागपूर विभागाचा 99.55 टक्के आहे. पूर्नपरीक्षर्थी निकालाची टक्केवारी 90.85 आहे.

957 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण

निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96 टक्के आहे. मुलांची टक्केवारी 99.94 असून राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

 

Advertisement