पुण्याच्या महामेट्रोने अल्पावधीत मोठी भरारी घेतली आहे. पुण्यात महामेट्रोची उभारणी अंतिम टप्प्यात असताना नव्या मुंबईतील मेट्रोच्या वाहतूक संचालनाचे आणि देखभाल, दुरुस्तीचे काम महामेट्रोला मिळाले आहे.

दहा वर्षांसाठी काम

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत वाहतूक संचालनाचे आणि देखभाल दुरुस्तीचे काम आता महामेट्रोकडे सोपविण्यात आले आहे.

त्यासाठी तयारी महामेट्रोने सुरू केली आहे. पुढील दहा वर्षांसाठी हे कंत्राट महामेट्रोला सोपविण्यात आले आहे. etro)

Advertisement

सिडकोने दिले काम

नवी मुंबई मधील मेट्रो प्रकल्पाची जवाबदारी असलेल्या सिटी अँड इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (सिडको) महामेट्रोला मार्गिका क्रमांक एकवर मेट्रो गाडी चालवण्याची आणि देखभाल दुरुस्तीची जबाबदारी दिली आहे.

तसेच याच मार्गाचं उर्वरित काम पूर्ण करण्याचे कंत्राटही महा मेट्रोला मिळाले आहे. महामेट्रो आणि सिडको दरम्यान याबाबत लवकरच करार होणार आहे.

महामेट्रोः नागपूर ते मुंबई व्हाया पुणे

राज्यात आता नागपूर, पुणे पाठोपाठ महामेट्रो नवी मुंबईत काम करणार आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचे काम सुमारे ९२ टक्के पूर्ण झाले असून दोन मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरू आहे.

Advertisement

उर्वरित दोन मार्गिकेचे काम या वर्षाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या खेरीज पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम ५८ टक्के पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर मेट्रोची चाचणी झाली असून पुण्यात येत्या काही महिन्यात मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

नाशिकच्या प्रकल्पाला लवकरच मंजुरी

महामेट्रोने डिझाईन केलेल्या नाशिक मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील चार शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबवणार आहे.

Advertisement

या शिवाय महामेट्रोने ठाणे आणि तेलंगणा राज्यातील वारंगल येथे मेट्रो प्रकल्पाकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

 

Advertisement