ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध शिथील

पिंपरी चिंचवड : कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता तागी प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात व्यवहार सुरू झाले.

दुकाने सात, तर हाॅटेल दहापर्यंत सुरू

शहरातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे, तर पिंपरी चिंचवड शहरातही ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरळीत सुरुवात झाली आहे.

नव्या नियमानुसार शहरात आता सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर हॉटेल्स आणि बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

लसीकरण सुरू

पिंपरी चिंचवड शहरातही ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शहरातील ३६ केंद्रांवर लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर दोनशे डोस उपलब्ध असणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात गेले काही दिवस लसीकरणामध्ये मोठा गोंधळ होत होता; मात्र ॲपवर नोंदणी असल्यामुळे लसीकरण केंद्रावर ज्यांची नावे आहेत, तेच नागरिक येत आहेत. त्यामुळे लसीकरण सुरळीत असल्याचं चित्र चिंचवडमध्ये पाहायला मिळालं.

पर्यटन स्थळे बंद

टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता करण्यात आल्यानंतर मागील रविवारी सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. प्रत्यक्षात मात्र पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड किल्ला आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद आहेत.

पाचशे रुपये दंड आणि गुन्हाही दाखलअतिरिक्त पोलिस बंदोबस्त त्यासाठी तैनात करण्यात आला वाहनांची तपासणी केली जात आहे. फिरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पाचशे रुपये दंड करण्यात येत आहेच, शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 188 नुसार गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.

You might also like
2 li