Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पुण्यातील निर्बंध कायम राहणार

रुग्णांची वाढती संख्या आणि तिस-या लाटेचा धोका यामुळे पुणे व शहर जिल्यातील निर्बंध कायम राहणार आहेत.

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवा

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सिल हॉलमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी वळसे पाटील म्हणाले, की जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे.

तसेच नियोजन करून पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे.

Advertisement

खबरदारी घेण्याचा सल्ला

दर पंधरा दिवसांनी रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आलेली आहे. दिव्यांग नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता प्रशासनाने तयारी केलेली आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

प्रशासनाने म्युकरमायकोसिस रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

शाळा, महाविद्यालये बंदच

नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी.

Advertisement

जे नियमांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये पंधरा जुलैपर्यंत बंदच ठेवण्यात येतील.

Leave a comment