निर्बंध असतानाही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुण्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. माॅल, सिनेमागृहे बंदच राहणार आहे.

दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंतच

पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वाढला आहे. काही दिवसांपूर्वी जो पॉझिटिव्हिटी रेट ४.६ होता आता तो 5.3 झाला आहे.

याच धर्तीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना कोरोना निर्बंधात सूट दिली नसून आहे ते निर्बंध कायम ठेवले आहे.

Advertisement

त्यामुळे शहरातील दुकाने ही सकाळी ७ दुपारी ४ पर्यंतच सुरु राहणार आहे. तसेच मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद राहणार आहे.

पुण्यासाठी ५१९ रुग्णवाहिका

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पवार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, की ३० जूनच्या रिपोर्टनुसार पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला असून काही दिवसांपूर्वी ४.६ असलेला रेट ५.३ टक्के झाल्याचा सांगितले.

Advertisement

यामुळे मागील आठवड्यात लागू केलेले कोरोना निर्बंधच कायम ठेवले आहे. तसेच त्यांनी या वेळी या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. याचवेळी पुणे शहर ५१९ रुग्णवाहिका शहर आणि जिल्ह्यासाठी घेण्यात आल्या असल्याची माहिती दिली.

पुण्यातील मॉल का बंद ?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बंद करण्यात आलेले मॉल कधी सुरू करणार याबाबत पवार यांनी आपली भमिका स्पष्ट केली आहे.

पवार म्हणाले, की पुण्यातील मॉल्स सुरू करण्याबाबत विचार केला होता; परंतु मॉलमधील एसी आणि ग्राहक संख्या मोठी असल्याने ते बंद ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे.

Advertisement

हाॅटेल व्यावसायिकांत नाराजी

राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे पालिकेनेही निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी संध्याकाळी सातपर्यंत असलेली दुकानांची वेळ तीन तासांनी कमी करण्यात आली आहे.

तर, हॉटेल-रेस्टॉरंट-बार यांची वेळही सहा तासांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी, हॉटेल व्यवसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

 

Advertisement