पुणे – पुणेकरांसाठी (pune) महत्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच पुणेकरांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. होय.., कारण शहरातील ऑटोरिक्षा चालकांनी भाडेवाढीची मागणी केली असून, पुन्हा एकदा तुम्हाला रिक्षासाठी (Auto Riksha) अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे आता रिक्षा भाडेवाड (Pune Auto Price) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सामान्य पुणेकरांना रिक्षाने (Pune Auto Price) प्रवास करण्यासाठी थोडा जास्त खिसा खाली करावा लागणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या दरांनी सामांन्यांचे बजेट बिघडले आहे.

यातच आता आणखी एक झटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता नागरिक चांगलेच हैराण झाल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे.

12 ऑगस्ट रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत झालेल्या बैठकीत, ऑटोरिक्षा संघटनांनी पहिल्या 1.5 किमीसाठी 6 रुपये भाडेवाढ प्रस्तावित केली होती आणि प्रति किमी 4 रुपये वाढ सुचवली होती.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मागणी मांडली जाईल, असा प्रस्ताव होता. ऑटोरिक्षा महासंघाचे नेते बापू भावे म्हणाले,

की प्रति किलो सीएनजीचा दर ₹ 90 पर्यंत पोहोचला होता, म्हणून आम्ही भाडे वाढवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे म्हणाले,

की भाडेवाढीबाबत 12 ऑगस्ट रोजी बैठक झाली आणि अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण आरटीएसमोर ठेवण्यात आले आहे. अद्याप यावर निर्णय झालेला नाही.

दरम्यान, 1 ऑगस्टपासून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना 2 रुपये अतिरिक्त भाडे वाढ (Pune Auto Price) केली आहे.

त्यामुळे सध्या रिक्षा चालक पहिल्या एक किलोमीटरसाठी 23 रुपये भाडे आकारात आहेत, तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 15 रुपये भाडे घेत आहेत.

इंधन आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचे (CNG) वाढते दर आणि रिक्षाचालकांची होणारी आर्थिक परवड पाहता परिवहन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला होता.

मात्र, आता पुन्हा एकदा पुणे शहरातील ऑटोरिक्षा चालकांनी (Pune Auto Price) भाडेवाढीची मागणी केली असून, या निर्णयाला ग्रीन सिग्नल मिळतो का? पाहणे महत्वाचे ठरणार आहे.