जबील भरल्याशिवाय जोड न देण्याचा पवित्रा महावितरणने घेतल्यामुळे माळेगाव नगरपंचायतीतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

७२ लाख रुपये थकीत

माळेगाव नगरपंचायतीकडे महावितरणची ७२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी किमान २५ लाख रुपये भरल्याखेरीज माळेगाव नगरपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा वीजपुरवठा जोडणार नाही, अशी ठोस भूमिका महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता डी. व्ही. गावडे यांनी घेतली आहे.

नगरपंचायत नव्याने अस्तित्वात आल्याने आणि पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या बॅंक खात्यावर काहीच पैसे शिल्लक नसल्याने माळेगावचे प्रशासन सध्यातरी वीज बिल भरू शकत नाही, असा पेच निर्माण झाला आहे.

Advertisement

उत्पन्नाचा स्त्रोच बंद

या प्रतिकूल स्थितीत मात्र ३५ हजार लोकसंख्या असलेल्या माळेगावकरांचे दैनंदिन जीवनविस्कळीत होऊ लागले आहे. माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) नगरपंचायतीचा कार्य़काळ सुरू होऊन साधारणतः तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सरकारने बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांना नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून कामकाज पाहण्यास नियुक्त केले आहे.

माळेगावची ३५ हजार लोकसंख्या विचारात घेता येथील मूलभूत सोईसुविधा पुरविण्यासाठी हे प्रशासन या ना त्या कारणांनी कमी पडत आहे. अर्थात प्रशासन चालविण्यासाठी नगरपंचायत अथवा ग्रामपंचायतीची अर्थिक स्थिती चांगली असावी लागते; परंतु माळेगाव नगरपंचायतीची अर्थिक स्थिती खूपच नाजूक आहे. परिणामी कामगारांचे वेतन, दैनंदिन खर्च आणि विज बिलांसारखी शासकिय देणी देण्यासाठी माळेगावात उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला आहे.

Advertisement