ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

किंमती वाढूनही होम अप्लायन्सेला वाढती मागणी

टाळेबंदीच्या काळात लोकांच्या गरजा बदलल्या. त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यावर खरेदीसाठी गर्दी उसळली. त्यामुळे या वस्तूंची टंचाई निर्माण झाली. त्यातच उत्पादनांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती.

त्यातून कच्चा माल मिळेनासा झाला. परिणामी या वस्तूंच्या किंमती १०-१५ टक्क्यांनी वाढल्या, तरीही या वस्तूंची मागणी कायम राहिली. आता पुरवठा साखळी सुरळीत झाली असून वस्तूंची मुबलकताही आहे; मात्र राज्य सरकारचे निर्बंध ही ग्रहक- विक्रेत्यांची अडचण ठरली आहे.

टीव्ही, फ्रीज, ओव्हनला मागणी

टाळेबंदीच्या काळात घरोघरी सर्वाधिक वापरल्या गेलेल्या वस्तूंमध्ये रेफ्रिजरेटर, ओव्हन आणि वॉशिंग मशीनचा समावेश असल्यामुळे आता त्यांच्यात अपडेटेड व्हर्जनची खरेदी करण्याची क्रेझ आली आहे. तसेच डिशवॉशर, मोठे टीव्ही, जादा क्षमतेचे वॉशिंग मशिन्सलाही वाढती पसंती मिळत आहे. टाळेबंदीमुळे सुमारे २०-२५ टक्क्यांनी होम अप्लायसन्सेची मागणी वाढली आहे.

डिशवाॅशरला मागणी

टालेबंदीच्या काळात घरातील रेफ्रिजरेटर, ओव्हन आणि वॉशिंग मशीनचा वापर वाढल्याचे गेल्या दीड वर्षांत दिसून आले. गेल्या टाळेबंदीमध्ये घरेलू कामगारांना सोसायट्यांत प्रवेश नव्हता. त्यामुळे भांडी धुण्यासाठी डिशवॉशरचा खप मोठ्या प्रमाणात वाढला. टाळेबंदीमध्ये नवे खाद्यपदार्थ तयार करण्याची क्रेझ वाढली. परिणामी घरांतील नागरिकांना फ्रिज लहान वाटू लागले. तीन किंवा चार सदस्यांच्या कुटुंबासाठी पूर्वी दोनशे लिटर क्षमतेपर्यंतचे फ्रिज घेतले जात. आता नागरिकांकडून ४०० ते ५०० लिटरचे फ्रिज खरेदी होत आहेत. अपडेटेड कॉम्प्रेसर, डिजिटल सेन्सर आणि फास्ट कुलींगची सुविधा नव्या तंत्रज्ञानाच्या फ्रिजमध्ये मिळत आहे. तसेच ‘मल्टी एअर फ्लो’ मुळे संपूर्ण रेफ्रिजरेटरमध्ये खेळती हवा राहते.

जादा क्षमतेच्या वाॅशिंग मशीन घेण्याचे प्रमाण वाढले

कपडे धुण्यासाठीही सहा किलोच्या वॉशिंग मशिनऐवजी दहा किलोचे वॉशिंग मशीन घेण्याचेही प्रमाण वाढते आहे. ऑटोमॅटिक व कपडे लगेच वाळतील, यावर त्यात भर दिला जात आहे. या दोन्हीमध्ये ५ स्टार असलेल्या वस्तूंना अधिक मागणी आहे. घरातच नागरिकांचा जास्त वेळ जात असल्यामुळे ३२ इंचाऐवजी ५५ इंच किंवा त्याहून मोठे टीव्ही घेण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे पीठ घरातच करण्यासाठी घरगुती गिरणीचाही खप वाढता आहे. मिक्सर ग्राईंडर बदलण्याचेही प्रमाण मोठे आहे. अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह- ओव्हनमध्येही आता नवे तंत्रज्ञान वापरण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे त्यातही अपडेटेड व्हर्जनचा वापर होऊ लागला आहे.

You might also like
2 li