पुणे – अपघातांचे (Accident) हॉट स्पॉट असलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस (Mumbai Pune express way) वेवरील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai Pune express way) महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रेमात वाढली असून, या अपघातांच्या संख्येत आणखी एक भर पडली आहे, नुकतंच या एक्स्प्रेसवे वर ट्रक उलटल्याने प्रवासी बसला धडकून मोठा अपघात (Road accident) झाला आहे.

मुंबई एक्स्प्रेसवे वर ट्रक उलटल्याने प्रवासी बसला धडकून काल रविवारी रात्री झालेल्या अपघातात 3 गंभीर व 7 किरकोळ जखमी झाले आहेत. महेश चव्हाण, पोलीस उप निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र, बोरघाट यांनी याबद्दल माहिती आली आहे.

रात्री 8.20 वा मुंबई – पुणे (Mumbai Pune express way) लेनवर किमी 40.600 येथे अपघात झाला होता व त्या अपघाताची (Road accident) माहिती मुंबई व ठाणे नियंत्रण कक्ष यांना देण्यात आली होती.

पोलिसांच्या (police) माहितीनुसार, चालक नावेद खान, रा. नागपूर हा ट्रक नं MH-40-BG- 3457 मध्ये भंगार माल घेऊन मुंबई कडे जात असताना त्या ठिकाणी पोहोचल्यावर ब्रेक फेल झाला.

तो मुंबई कडे जाणाऱ्या लेनवरून तो ट्रक पुण्याकडे जाणाऱ्या लेन वरून जाणाऱ्या प्रवासी बस KA-41-D-1471 हिच्या उजव्या बाजू कडील भागावर जाऊन धडकून पलटी होऊन पडला.

ह्या बस मधील दोन प्रवासी यांना गंभीर दुखापत झालेली असून त्यांना IRB च्या ॲम्बुलन्स ने अधिक उपचाराकरिता खोपोली नगर पालिकेच्या हॉस्पिटल येथे घेऊन गेलेले आहे.

अपघातामधील व्ही आर एल च्या बस मध्ये एकूण 25 ते 30 प्रवासी होते. सदर प्रवासी मध्ये दोन गंभीर जखमी व सात किरकोळ जखमी झाले आहेत.

गंभीर जखमी प्रवासींना IRB च्या ॲम्बुलन्स ने अधिक उपचाराकरिता खोपोली नगर पालिकेच्या हॉस्पिटल येथे घेऊन गेलेले आहे. साधी दुखापत असलेल्या प्रवासांना जागेवर प्रथमोपचार करण्यात आलेले आहेत.

अपघातातील ट्रक व बस यांना IRB च्या क्रेनच्या साह्याने बाजूला घेऊ वाहतूक सुरळीत करून वाहतुकीसाठी दोन लेन रात्री 9.15 वा सुरू करण्यात आलेले आहेत. यावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

सरकारी अधिकारी दिलेल्या आकडेवारीसून लेक कटींग, ओव्हरटेकींग, अतिवेग या कारणांसोबत मानवी चुकांमुळे 80 टक्के अपघात (Road accident) मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर घडतात, असं काही महिन्यांपूर्वी सांगण्यात आलंय.