Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

गोळीबार करून एका व्यवसायिकाला लुटले, घटनेने एकच खळबळ

पुण्यात गोळीबार करून एका व्यवसायिकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री ही घटना उरुळी देवाची येथे घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी खंडू बाळ सराफ (वय ५३) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यवसायिक आहेत.

त्यांची उरुळी देवाची येथील जुना पालखी रोड येथे राज ट्रेंडिंग कंपनी आहे. तर त्यांचे गोडाऊन देखील आहे. दरम्यान गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते गोडाऊनमध्ये कामानिमित्त आले होते. यावेळी तीन तरुण त्यांच्या गोडाऊनमधर शिरले.

Advertisement

त्यांनी फिर्यादी यांना पिस्तूलाचा आणि कोयत्याचा धाक दाखवला. तर शिवीगाळ केली आणि एकाने थेट पिस्तूलातून जमिनीवर गोळी झाडात त्यांच्याजवळील सोन्याची अंगठी,१५ हजाराची रोकड व तीन मोबाईल चोरून नेले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Leave a comment