ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कंपनीवर दरोडा टाकून २५ लाखांच्या साहित्याची चोरी

कोण कशाची चोरी करील, याचा भरवसा नाही. आता पैसा-अडका, सोन्या-नाण्याऐवजी कंपनीतील उत्पादनांची चोरी करण्याचा प्रकार चाकणमध्ये घडला.

दरोडेखोरात दोन महिला

चाकण औद्योगिक परिसरातील व्ही टेक इंडस्ट्रीज इंडिया या कंपनीवर दरोडा टाकण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेत कंपनीच्या सुरक्षा भिंतीवरून सात पुरुष व दोन महिला दरोडेखोरांनी आतामध्ये प्रवेश करत तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल लुटला.

दरोडेखोरांनी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून त्याला मारहाण केली. या प्रकरणी सध्या दोन महिला आणि सहा जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.

सुटे भाग पळविले

मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक परिसरात व्ही टेक इंडिस्ट्रीज इंडिया ही कंपनी आहे. या कपंनीमध्ये स्पेअर पार्टचे उत्पादन होते. कंपनीत सात पुरुष आणि दोन महिला अवैध मार्गाने घुसले.

त्यांनी कंपनीच्या आतमध्ये प्रवेश करत आधी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तसेच त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर या दरोडेखोरांनी तांबे, पितळ या धातूचे टर्मिनल, लग्ज, वायरिंग हर्णेस असे सुटे भाग पळवले.

तसेच सुरक्षा रक्षकांचे एकूण तीन मोबाईल फोन चोरी केले. या दरोड्यामध्ये त्यांनी एकूण 25 लाख 87 हजार 247 रुपये किंमतीचा मुद्देमाल लुटून नेला.

पोलिसांकडून 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

दरोडा टाकणाऱ्या टोळीला म्हाळुंगे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आपल्या कारवाईमध्ये दोन महिला आणि सहा तरुणांना अटक केली आहे.

यादरोडेखोरांनी तांबे, पितळ या धातूचे एकूण 25 लाख 87 हजार 247 लाख किमतीचे स्पेअर पार्ट दरोडा टाकून लुटले.

या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल 33 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

You might also like
2 li