लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून केले जाणारे लसीकरण म्हणजे काही उपकार नाही तर कोणत्याही सरकारचे ते कर्तव्यच आहे. पण मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्याची युजीसीची सूचना आश्चर्यकारक आहे.

कदाचित ही गोष्ट पंतप्रधानांनाही माहीत नसेल, असा उपररोधीक टोला लगावत आमदार रोहित पवार यांनी युजीसीवर टीका केली आहे.

अवघ्या जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या संकटाला थोपवण्यासाठी सरकारकडून लसीकरणावर अधिक भर दिला जातोय. त्या अनुशंगाने १८ वर्षांवरील सर्वांना केंद्र सरकारतर्फे मोफत कोरोना लस देण्याबाबत घोषणा केली होती.

Advertisement

त्यानंतर देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार असा उल्लेख असलेला फलक लावण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. यावरून आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

दरम्यान,यूजीसीच्या या सूचनेवरून शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी संघटना आणि काही राजकीय पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अनेक विद्यार्थी संघटनेने याला आता तीव्र विरोध केला आहे.

Advertisement