मुंबई – आशिया चषक (Asia cup) स्पर्धेत भारताने विजयी शुभारंभ केला आहे. भारताने पहिल्याच सामन्यात परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच विकेट राखून विजय मिळवला आहे. रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) आणि हार्दिक पंड्या (Hardik pandya) भारताच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनी टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाच भूमिका बजावली. रवींद्र जाडेजाने 29 चेंडूत 35 धावा केल्या असून, हार्दिक पंड्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. यावेळी या दोघांच्या दमदार धावांची भागीदारी पाहायला मिळाली.

दरम्यान, या भारताच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांप्रमाणे पवार कुटुंबियांनीही भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेतल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळाले.

सामना जिंकल्यानंतर क्रिकेट प्रेमी शरद पवार (Sharad Pawar) यांचा जल्लोष कसा होता हे सुप्रिया यांनी या व्हिडीओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, यावर रोहित पवार यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. “शरद पवारांमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून?’ रोहित पवारांना (Rohit Pawar) पडला आहे. या संदर्भातील ट्विट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

आपल्या ट्विट मध्ये रोहित पवार म्हणतात….

“शरद पवार (Sharad Pawar) यांचा व्हिडीओ पाहून मी अवाक झालो. सकाळी द्राक्ष बागायतदार संघाचं अधिवेशन आणि आणखी एका कार्यक्रमासाठी शरद पवार हे मुंबईवरून पुण्याला आले.

कार्यक्रमानंतर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या व सायंकाळी 7 ते 8 च्या सुमारास पुन्हा पुण्याहून निघून रात्री उशिरा मुंबईला पोहोचले”

त्यानंतरही त्यांनी भारत-पाकिस्तान संपूर्ण मॅच पाहिली आणि आपला भारतीय संघ विजयी झाल्यानंतर आपण जसे मनापासून आनंद व्यक्त करतो तसा दोन्ही हात उंचावून उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला.

आज सकाळपासून साहेब परत ठाणे दौऱ्यावर आहेत. साहेबांचं हे काम गेली 60 वर्ष असंच अविरत काम सुरूय.. त्यामुळं तुमच्यासारखाच मलाही प्रश्न पडतो की,

साहेबांमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून? कदाचित यामुळेच ते माझ्यासारख्या लाखो तरुणांचे ‘आयडॉल’ आहेत…” या आशयाची पोस्ट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.