पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कर्जत जामखेडचे (Karjat-Jamkhed) आमदार आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. तसेच भाजप नेत्यांना टोमणा देखील लागलेला आहे.

रोहित पवार कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार (MLA) म्हणून ओळखले जातात. कर्जत जामखेडमधील कामांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. त्यामुळे त्यांचे सर्वच स्थरातून कौतुक केले जाते.

भाजपवर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, भाजपच्या नेत्यांची अशी राजकीय वक्तव्य करण्याची पद्धत ही आताची नाही, तर ती फार जुनी आहे.

Advertisement

ही भाजपच्या नेत्यांना लागलेली सवय लवकर जाईल अशी काही चिन्हे दिसत नाहीत, अशी सडकून टीका आमदार रोहित पवारांनी (rohit pawar) केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गुजरातच्या (gujrat) भूकंपावेळी सुध्दा शरद पवारांची (sharad pawar) मदत घेतली होती. तेव्हा ते भारताचे पंतप्रधान नव्हते, असा खोचक चिमटाही त्यांनी भाजपच्या नेत्यांना काढला आहे.

मागील दोन वर्षात कोरोनाच्या काळातही इतके वय झालेले असताना सुध्दा शरद पवारांनी आराम केला नाही. तर प्रत्यक्ष जनतेत मिसळून त्यांना सहकार्य केले आहे, आणि जनतेच्या मनात असलेली भीती त्यांनी दूर केली.

Advertisement

शरद पवार साहेबांवरती भाजपकडून वारंवार अशा पध्दतीची टीका केली जाते. पण त्यांच्या टीकेत काहीचं अर्थ नसतो हे जनतेला सुध्दा माहित आहे असे म्हणत रोहित पवार यांनी कडव्या शब्दात भाजपवर टीका केली आहे.