मुंबई : कर्जत जामखेड (Karjat-Jamkhed) मतदार संघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप (BJP) नेत्यांवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जवरूनही त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

गेल्या काही दिवसात ड्रग्ज (Drugs) वरून महाराष्ट्रात चांगलेच वादळ सुरु होते. त्यांनतर गुजरातमध्येही (Gujrat) मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले होते. त्यावरून रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

गुजरात मध्ये सापडलेल्या ड्रग्जच्या तुलनेत महाराष्ट्रात (Maharashtra)  १ टक्के ड्रग्ज सापडले तरी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, यामागणीसाठी राज्यातल्या काही भाजप नेत्यांनी राजभवनावर (Raj Bhavan) मुक्कामच ठोकला असता असे म्हणत रोहित पवार यांनी भाजप नेत्यांना चिमटा काढला आहे.

Advertisement

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात ड्रग्ज सापडल्यावर बोलणाऱ्या नेत्यांनी भाजपशासीत राज्यात सापडणाऱ्या ड्रग्जवर बोलायला हवे असेही रोहित पवार यांनी ट्विट (Twit) मध्ये म्हणाले आहेत.

केवळ बिगर भाजपशासित राज्यात थोडे जरी ड्रग्ज सापडले तरी आगडोंब करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी भाजपशासित राज्यात सापडणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या ड्रग्जवरही बोलले पाहिजे.

Advertisement

कारण युवांच्या सुरक्षित भवितव्यासाठी ड्रग्ज या विषयाकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे असे रोहित पवार म्हणाले.