कोरोनाचे नवे रुप म्हणजेच ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. डोंबिवलीनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे या विषाणूने शिरकाव केला आहे.(Omicron patient)

पुण्यात एक आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे सहा असे एकूण सात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉनग्रस्तांचा आकडा आता आठवर गेला आहे.

दरम्यान महापालिकेच्या वतीने संपर्कात येणाऱ्या संपूर्ण सोसायटीचेच आरटीपीसीआर (RTPCR) ही प्रयोगशाळेतील चाचणी करण्यात आली आहे.

जगभरातील कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण असल्यामुळे राज्यात अतिजोखमीच्या देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

याच नेहमीच्या सर्वेक्षणातून ४७ वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron variant) संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तो नोव्हेंबर महिन्यात फिनलंड येथे गेला होता. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील निदानातून हे पुढे आल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच प्रयोगशाळेत घेतली जाणारी आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली आहे.

लवकरच त्यांचे निदान पुढे येईल. महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने ओमिक्रॉन बाधित रुग्णांसाठी कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले,‘‘ओमिक्रॉन बाधित या रुग्णाला सौम्य लक्षणे आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याच कोरोना चाचण्या करण्यात येत आहे.