Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी नियमावली

कोविड स्थितीत सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. बकरी ईदसाठी सरकारनं नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

जनावरांचे बाजार बंद

कोविड या विषाणूच्या संसर्गामुळे उद्धवलेली परिस्थिती पाहता विविध उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत.

कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, म्हणूनच यंदा २१ जुलै रोजी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे.

त्यास अनुसरून बकरी ईदची नमाज मशीद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

तसेच सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावी.

नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.

आवश्यकता भासल्यास आणखी नियम

बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र न जमण्याच्या सूचनाही गृह विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आलेल्या आहेत.

कोविड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

तसेच या मार्गदर्शक सूचनांच्या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील पालन करावे, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a comment