पुणे – गणेशोत्सव (rules for Ganeshotsav) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या उत्सवात शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव मंडळांकडून अनेक मोठे कार्यक्रम सादर करण्यात येतात. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (corona) विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच सण आणि कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आले आहे. मात्र, आता यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्या सर्वांच्या जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, यासाठी काही नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे.

पुणे (pune city) महानगरपालिकेच्या हद्दीत 23 गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या समाविष्ट झालेल्या गावांमधील गणेशोत्सव मंडळांची (rules for Ganeshotsav) महापालिकेत नोंद नाही.

त्यामुळे यावर्षी या मंडळांना महापालिकेकडे अर्ज करून परवाना (rules for Ganeshotsav) घ्यावा लागणार आहे. पाच वर्ष म्हणजेच 2027पर्यंत हा परवाना असणार आहे.

नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव मंडळांची (Ganesh Mandals) बैठक घेताना मंडळांना पुढील पाच वर्षांची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार, पोलीस आयुक्तांनी सर्व स्थानिक पोलीस (Pune Police) ठाण्यांना संबंधित परवाने देण्याचे आदेश द्यावेत, असे पत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले आहे.

दरम्यान, 2019 मध्ये मंडळांना महापालिकेने परवाने दिले आहेत. 2022 ते 2027 पर्यंत हेच परवाने पाच वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

महापालिकेच्या जुन्या हद्दीत असलेल्या गणेशमंडळांनी महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र आधीच घेतले आहे. मात्र नवीन 23 गावांतील मंडळांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही.

त्यामुळे संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना नव्या मंडळांची नोंदणी करून घेण्याचे आदेश अतिक्रमण विभागाने दिले असून, लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करवली असं देखील सांगण्यात आलं आहे.