मुंबई : १९ फेब्रुवारीला राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोरोनामुळे (Corona) गेली २ वर्षे शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करण्यासाठी नियम लावले जात आहेत. यावेळीही मुख्यमंत्र्यांनी (CM) शिवजयंतीसाठी काही नियम जाहीर केले आहेत.

१९ फेब्रुवारीला राज्यात (State) शिवजयंतीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नियमावली जाहीर केली आहे. यावर्षीही शिवजयंतीवर निर्बंध असणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.

येणाऱ्या शिवजयंतीसाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj desai)यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

Advertisement

शिवजयंती सोहळ्यासाठी शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येईल अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली आहे. तसेच कोरोना नियमांबाबत काही निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

Advertisement

शिवजयंती सोहळ्यासाठी फक्त ५०० जण उपस्थित राहू शकतात आणि शिवज्योत आणण्यासाठी २०० जण जाऊ शकतात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.