पुणे – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

दरम्यान, राज्यातील (maharashtra) सत्तासमीकरणांमध्ये झालेल्या या बदलांचे पडसाद आता विविध आस्थापनांमध्ये दिसून येऊ लागले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर (Maharashtra State Commission for Woman) आलेल्या रूपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी आपल्या पदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

“राज्यात सरकार बदललं तरी मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही’, असं स्पष्टपणे रूपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी सांगितलं आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रूपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी सांगितले की, राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे.

ते स्वीकारण्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पद सोडले होते. त्यामुळे राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नवं सरकार सत्तेवर आलं तरी हे पद सोडण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्या पुढे म्हणाल्या, ‘राज्यातील महिलांची सुरक्षा, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून महिलांना न्याय देण्याचं काम महिला आयोगाकडून केलं जाईल’. असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) 7 जुलै रोजी अधिकृतपणे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारला आहे.