पुणे : शहरात कोरोना रुग्णवाढीचा (Corona Patients) वेग वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच ओमिक्रॉननेही (Omicron) हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर (NCP Rupali Chakankar) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar) यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट (Twit) करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Test Positive) आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी.

Advertisement

लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन. असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर करून कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.

याअगोदरही मंत्री आणि काही आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. या सर्वानी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वाना कोविड टेस्ट करून घेयला सांगितली आहे.

राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण वाढल्यामुळे प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.

Advertisement

प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की, आता लॉकडाउन नाही मात्र कठोर निर्बंध लावावे लागतील. त्यामुळे लसीकरण पूर्ण असणार्यांनाच जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी प्रवेश मिळणार आहार.