पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) मुक्ताईनगरकडे (Muktainagar) येत असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला (Attack) केला आहे. गाडीवर दगडफेक (Stone throwing) करत हा हल्ला करण्यात आला आहे.

रोहिणी खडसे यांच्या वाहनांची या हल्यात किरकोळ तोडफोड झाली असल्याची माहिती मिळत आहे. हल्यात खडसे यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

रोहिणी खडसे यांच्या अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) गंभीर दखल घेली आहे.

Advertisement

पोलिसांना (Police) हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. पूण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यामधून खडसे सुखरूप बचावल्या आहेत.

वाहनाचे नुकसान झाले. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते. हल्ला करणारे कोणीही असे सुटता कामा नये, त्यांच्यावर कडक कारवाई (Action) करण्यात यावी.

Advertisement

जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करून, त्यांना अटक (Arrest) करावे अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. पोलिसांना हल्लेखोरांना पकडण्यात यश आले नसले तरी त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.