मनसेच्या (MNS) डॅशिंग नेत्या मानल्या जाणाऱ्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

पक्षाच्या अंतर्गत वादामुळे रुपाली पाटील नाराज असल्यामुळे राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

रुपाली पाटील या हाती घड्याळ बांधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थित पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार आहेत.

Advertisement

मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पाटील यांचा प्रवेश होणार आहे. रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेला चांगला धक्का बसला आहे.

पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचे पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांचे एक ट्विट चांगलेच व्हरल झाले होते.

वसंत मोरे यांनीही पाटील यांच्यावर टीका केली आहे. वसंत मोरे यांनी रुपाली पाटील यांच्या जाण्याने मनसेला काही खिंडार पडले नसल्याचे म्हंटले होते.

Advertisement

त्यांनी एक फोटो ट्विटर वर शेअर केला होता. राज ठाकरे (Raj Thakare) यांच्यासमवेत स्वतःचा आणि मनसेच्या साईनाथ बाबर (Sainath Babar) यांचा फोटो शेअर केला होता.

”जब हम दो साथ खडे तो सबसे बडे” अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत. असे कॅप्शन दिले होते. त्यामुळे त्यांच्या ट्विट ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

Advertisement