पुणे : मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी राजीनामा दिला आहे.

पक्षाच्या अंतर्गत वादामुळे रुपाली पाटील नाराज असल्यामुळे राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आद्ल्यादिवशीच राजीनामा दिल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे.

पुणे महापालिका निवडणूक तोंडावर असताना रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मासला एक मोठा धक्का मानला जात आहे.

रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा असताना त्यांनी शिवसेना (Shivsena) नेत्यांची भेट घेतल्याने वेगळ्याच चर्चाना उधाण आले आहे.

Advertisement

रुपाली पाटलांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पुणे दौरा आहे. याअगोदरच रुपाली पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केले आहे. पाटील यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. युवासेनेच्या इन्स्टाग्राम पेजवर रुपाली पाटील यांनी भेट घेतल्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

‘आज मुंबई येथे सौ. रुपाली पाटील ठोंबरे यांनी महिलांचे विविध प्रश्न घेऊन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी शिवसेना सचिव सुरज चव्हाण देखील उपस्थित होते.’

Advertisement

अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र या भेटीचे नेमके कारण काय आहे, त्यामुळे वेगळ्याच चर्चाना उधाण आले आहे. रुपाली पाटील यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

पाटील यांनी मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली आहे.

Advertisement