पुणे : कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यात चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil) यांनीही कडव्या शब्दात टीका केली आहे.

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) दारू पिऊन नाचतात आणि भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याही दारू पितात अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधान केले होते.

अनेक पक्षातील नेत्यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच कराडकरांनी माफी मागायला हवी असेही अनेक पक्षातल्या नेत्यांनी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

Advertisement

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली असली तरी हे प्रकरण काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अनेक स्तरातून बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही कराडकरांवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, बंडातात्या कराडकरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर कोर्टातून गुन्हा दाखल करणार आहे.

कोर्टातून १५६-३ नूसार गुन्हा दाखल करणार आहे. बंडातात्यांनी माफी मागितली म्हणजे संपले का ? काल बंडातात्या दारू पिऊन बोलले, असे रुपली पाटील म्हणाल्या आहेत.

Advertisement

बंडातात्या वडीलधारी आहेत. त्यांनी बोलताना भान बाळगायला हवे. सुप्रिया सुळे या महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्या आहेत. कोण दारू पिऊन पडते यापेक्षा त्यांनी वाईनला विरोध करावा.

मात्र सुप्रिया सुळे यांचे नाव घेताना तारतम्य बाळगायला हवे. मी या घटनेचा निषेध करते, असे म्हणत रुपाली पाटील यांनी बंडातात्या कराडकर यांचा निषेध केला आहे.

Advertisement