पुणे : मनसेच्या (MNS) डॅशिंग नेत्या मानल्या जाणाऱ्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

पक्षाच्या अंतर्गत वादामुळे रुपाली पाटील नाराज असल्यामुळे राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.

रुपाली पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हाती घड्याळ घातले आहे.

Advertisement

यावेळी पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी रुपाली पाटील यांची स्तुती केली आहे. अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, रुपालीताई धडाकेबाज आहेत.

त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळेच त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांचा नक्कीच आमच्या पक्षाला १०० टक्के फायदा होईल यात शंका नाही.

पुणे शहरात त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचे नाव लौकिक आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला असला तरी येत्या काळात पक्षाकडून आणखी मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

Advertisement

या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहेत. असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. रुपाली पाटील यांच्यासमवेत मनसेच्या लावण्या शिंदे,

मनीषा सरोदे, प्राजक्ता पाटील, वंदना साळवी, प्रिया सूर्यवंशी पाटील, अजय दराडे, अभयसिंह मांढरे, यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

Advertisement