पुणे – गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या मिशन बारामतीची (baramati) राज्याच्या राजकाणात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बारामती दौऱ्यादरम्यान 2024 च्या निवडणुकांमध्ये बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. “2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात 45 प्लस आणि विधानसभेला 200 प्लस हे सूत्र आम्ही ठरवले’ असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काही दिवसांपूर्वी केलं होत.

दरम्यान, पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांनी असच एक वक्तव्य केलं असून, याची देखील राज्याच्या रकरणात चांगलीच चर्चा होत आहे. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

नुकतंच, खेडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी “बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडू’ असं वक्तव्य केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare Patil) यांनी बावनकुळे यांच्यावर टीकेचा बाण सोडत त्यांना उपचारांची गरज असल्याचं म्हटलं.

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कोणीतरी उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जा. सातत्याने त्यांना घड्याळ बंद पाडू, महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही, हे त्यांचं झटक्याचं जे लक्षण आहे त्यावर त्वरित उपचाराची गरज आहे,” असं म्हणत रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombare Patil) यांनी जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचली पाहिजे, दिवाळीच्या मुहुर्तावर अन्नधान्याचे किट मिळाले पाहिजे असे प्रश्न न सोडवता, त्यांना जे सातत्याने झटके येतायत त्वरित उपचार होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं”. असं म्हणत बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.