पुणे – शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोर अज्ञात आहेत. आमदार जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने जाधव यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा असा संघर्ष निर्माण झालेला असतानाच आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घराच्या आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये राडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अश्यातच, आता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी यावर प्रतिक्रिया देताना थेट हल्लेखोराचं नाव सांगितलंय. राणे आणि राणेसमर्थकांनी (Narayan Rane) हा भ्याड हल्ला केल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलाय.

पण असे भ्याड हल्ले करायला यांना लाजा वाटत नाही, हा भ्याड हल्ला आहे… आम्हाला उगाच चिडायला लावू नका, असा देखील इशारा रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी दिलाय. यावेळी त्या एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, “आरोप प्रत्यारोपांचा विषय निघाला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मुलं अनेक शब्द वापरतात. भाजपाचा सुसंस्कृत राजकारणाचा वसा आहे.

त्यांचे वडील स्वत: केंद्रात आहेत. भास्कर जाधवांवर टीका करताना त्यांनी जीभ अनेकदा घसरली आहे. कसं बघता या सगळ्या राजकारणाकडे?” असा प्रश्न ठोंबरे यांना विचारण्यात आला.

नारायण राणे आणि त्यांच्या दोन पोरांनी आता आवरतं घ्यावं. खरंच यांना बाळासाहेब ठाकरे यांचा शाप लागलाय. इथले कर्म इथेच फेडावे लागतील, याची दक्षता त्यांनी घ्यावी, असा इशारा सुद्धा रुपाली ठोंबरे यांनी दिलाय.