पुणे – मंगळवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या वाहनावर पुणे शहरातील कात्रज (pune katraj) परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत (Uday Samant) यांच्या वहानाची मागची काच फुटली. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख व आमदार ‘आदित्य ठाकरे’ (aaditya thackeray) यांची मंगळवारी पुण्यातील कात्रज चौकात सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती.

ही सभा आटोपल्यानंतर शिवसेनेचे काही कार्यकर्ते तेथून जात होते. आणि याच दरम्यान, त्यांना शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांची चारचाकी गाडी दिसली.

Advertisement

यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या. उदय सामंत हल्ल्याप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) म्हणल्या की, “बंडखोर नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत नवीन गटाची स्थापना केली. तेव्हापासून शिवसैनिकांच्या मनात राग हा कायम आहे.

Advertisement

आतापर्यंत शिवसैनिकांनी संयम बाळगला पण आता संयमाचा बांध सुटला असून पुण्यात जे झालं तीच गद्दारांबाबतची खरी प्रतिक्रिया असल्याचे, रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी सांगितले आहे.

पुढे त्या म्हणल्या, ‘एखाद्या बायकोसोबत अडीच वर्ष संसार करायचा आणि मग कुरघोड्या काढायच्या ही जुनी सवय आहे, अडीच वर्ष हेच उदय सामंत (Uday Samant) मंत्री राहिले आणि

आता ईडी सीबीआय मागे लागली म्हणून बंडखोरी केली म्हणून त्यांना आता काय बोलावं ते सुचत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. यावेळी त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

Advertisement