मुंबई : देशात ५ राज्यांच्या निवडणूका (5 State Assembly Elections) जाहीर झाल्या आहेत. यामध्ये सर्वच पक्ष प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. निवडणूक प्रचारामध्ये सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शिवसेनेबद्दल (Shivsena) वादग्रस्त विधान केले आहे.

भाजपचे (BJP)साथीदार मानले जाणारे सदाभाऊ खोत यांनी गोव्यातही (GOA) शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच सदाभाऊ खोतांनी संजय राऊतांचाही (Sanjay Raut) समाचार घेतला आहे.

हा बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे, फक्त तोंडाची वाफ घालवण्याचं काम ते करत आहेत. त्यामुळे त्या माणसाला फार गणतीत धरणं आवश्यक नाही, असा हल्लाबोल त्यांनी राऊतांवर चढवला आहे.

Advertisement

शेजारच्या घरात पाळणा हलायला लागला की आपल्या हातात दोरी येईल असे यांना वाटतंय, पण असे होत नसते, कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हलत असतो.

यांच्याकडे पाळणा कसा हलेल वांझोट्या ना लेकरे बाळ होत नसतात असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना त्यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) देखील टोला लगावला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. सौ चुहे खाके बिल्ली चली हज को अशी परिस्थिती आहे.

Advertisement

राऊतांना वाईनचा रोज डोस जास्त होत असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बोलत असतात त्यामुळे आता गुळाचे वाईन देखील राज्यात सुरू करावी अशी टीकाही संजय राऊतांवर सदाभाऊ खोत यांनी केली आहे.