मुंबई : सरकारने वाईन (Wine) विक्रीला परवानगी दिल्यानंतर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांवर चांगले दिवस यावे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्राद्वारे शेतकरी हिताच्या मागण्या मान्य कराव्या अशी विनंती केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी या पत्रामध्ये सांगितले की, राज्यातील गुळ उत्पादक शेतकरी हा मोठ्या अडचणीतून आला असून अनेक गुऱ्हाळघरे बंद पडलेली आहेत.

ही गुऱ्हाळघरे जर नव्याने पूर्वीसारखी चालवायची असतील तर, गुळापासून गावठी हातभट्टी वाईन बनवायला परवानगी देण्यात यावी.

Advertisement

ही वाईन कमी खर्चात तयार करता येईल. गुळाची वाईन तयार करण्याचे कारखाने (Factory) गावागावांमध्ये उभा करता येतील. यातून रोजगार तर वाढेलच पण ऊस उत्पादकांना (Sugarcane growers) सोन्याचे दिवस येतील.

तसेच आदिवासी शेतकऱ्यांनाही सरकारने न्याय देणे गरजेचे आहे. मोहाच्या फुलांची वाईन बनवून त्याच्या विक्रीला परवानगी द्यावी. असे सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

त्याचसोबत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने किराणा दुकानामध्ये आणि मॉलमध्ये (Mall) वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला आहे.

Advertisement

त्याचं महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आनंदाने स्वागत करत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर चांगले दिवस येणार आहेत.असेही सदाभाऊ यावेळी म्हणाले आहेत.