मुंबई – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Vedanta-Foxconn Project) C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्यानंतर राजकीय वातावरण तापले असताना, अश्यातच आणखी एक मोठा उद्योग प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर गेला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा ‘सॅफ्रन’ (Safran Project) कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे. त्यामुळे ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सत्ताधारी-विरोधकांमधील वाद आणखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

सॅफ्रन ग्रुप (Safran Project) मिहानमध्ये 1185 कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पामुळे 500 ते 600 कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता.

सॅफ्रन ग्रुपने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (एमएडीसी) ही जागा घेण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र जागा मिळण्यास विलंब होत असल्याने हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी सॅफ्रन ग्रुपचे सीईओ ऑलिव्हियर अँड्रेस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. मग महाराष्ट्रात जागेअभावी हा प्रकल्प हैदराबादला गेला.

सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीचा युनिट बनवणार होती. सॅफ्रन कंपनी मिहानमध्ये 1 हजार 185 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे.

दरम्यान, एअरबस प्रकल्प देखील आता गुजरातच्या हातात गेला असून, 22 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प होता. यानंतर राज्य सरकावर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.