मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र मनसेने संजय राऊतांनी निराशा केल्याचे म्हणत टोला लगावला आहे.

भाजपचे मोहित कंबोज (Mohit Kamboj), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पत्रकार परिषदेमध्ये (Press Conference) आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या मुलावर नील सोमय्यांवरही आरोप केले आहेत.

नील सोमय्याच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नातही साडे नऊ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे.

Advertisement

मनसेचे संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, संजय राऊत हे भाजपमधील साडे तीन लोकांची नावं सांगणार होते. पण त्यातील स देखील बाहेर आला नाही.

राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली आहे. त्यामुळे राऊत यांच्यावर फसवणुकीचा, 420 चा गुन्हा दाखल करावा.

त्याचबरोबर शिवजयंतीला बंधनं घालणाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे की आज ज्या पद्धतीची गर्दी जमली होती, त्यामुळे कोरोना पसरणार नाही का? कोरोना पसरवायला ही गर्दी नव्हती का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे.

Advertisement

आजची पत्रकार परिषद शिवसेनेचे नव्हती तर संजय राऊत यांची वैयक्तिक होती. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे महत्वाचे मंत्री नव्हते. तसेच आजची पत्रकार परिषद नाही तर केवळ भाषण होते असे म्हणत देशपांडेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.