मुंबई – सल्लू भाई उर्फ ​​भाईजानने (Salman Khan) चाहत्यांना एक ट्रीट दिली आहे. सोशल मीडियावर शर्टलेस फोटो शेअर करून त्याने वय हा फक्त एक आकडा असल्याचे सिद्ध केले आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याची तुमच्यात जिद्द असेल, तर त्यासाठी वय महत्त्वाचे नाही. सलमान खान (Salman Khan) 56 वर्षांचा असून तो फिटनेसच्या बाबतीत सर्वांना प्रेरित करतो.

या फोटोमध्ये बायसेप्स, ट्रायसेप्स, बॉडी, 6 पॅक ऍब्स, सर्वकाही परिपूर्ण दिसते. सलमान खानने (Salman Khan) इंस्टाग्रामवर शेअर केलेला स्वतःचा शर्टलेस फोटो हा जिममधला आहे.

वर्कआउटनंतर सलमान खानने (Salman Khan) स्वतःचा हा बॉडी लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. फोटोमध्ये सलमान खान ज्या पद्धतीने अॅब्स फ्लॉंट करताना दिसतोय, त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

कानात झुमके घातले आहेत, जे त्याच्या लूकमध्ये आणखीनच आकर्षण निर्माण करत आहेत. सलमान खान (Salman Khan) त्याच्या आगामी ‘भाईजान’ चित्रपटाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून सलमान खान जिम मध्ये घाम गाळत आहे. फोटो शेअर करताना सलमान खानने कॅप्शनमध्ये ‘Being Strong’ असे लिहिले आहे. हे सलमान खानचे ब्रँड नेम आहे.

सलमान खानने त्याचा शर्टलेस फोटो शेअर करताच इंटरनेटवर खळबळ उडाली. लवकरच तो व्हायरल झाला. गेल्या काही काळापासून असे दिसून येत आहे की,

सलमान खान जेव्हा जेव्हा स्वतःचा शर्टलेस फोटो अपलोड करतो तेव्हा तो चाहत्यांमध्ये चर्चेत येतो. सलमान खानच्या या फोटोवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

हार्ट आणि फायर इमोजी बनवून त्याच्या टोन्ड बॉडीचे कौतुक करत आहे. काही जण त्याला ‘बिगेस्ट फॅशन आयकॉन’ म्हणत आहेत तर काही विचारत आहेत की तो ‘भाईजान’ची घोषणा कधी करणार?

दरम्यान, सलमान खानने अद्याप त्याच्या चित्रपटाचे नाव घोषित केलेले नाही. ‘भाईजान’ असे या चित्रपटाचे नाव असून, चाहते त्याबाबत केवळ अंदाज बांधत आहेत.

यासाठी काही वृत्तांतही दावा केला जात आहे, मात्र कशाचीही पुष्टी झालेली नाही. आधी या चित्रपटाचे नाव ‘कभी ईद कभी दिवाळी’ असे सांगितले जात होते, नंतर त्याचे नाव ‘भाईजान’ ठेवण्यात आले होते.

या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी आणि राघव जुयाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.