केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यानं त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. बीड आणि नगरनंतर आता हे लोण पुण्यापर्यंत पोचले आहे.

३६ पदाधिका-यांचे राजीनामे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

बीडमध्ये 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. या नाराजी नाट्याची लाट आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचली आहे.

Advertisement

कायंदे यांचा राजीनामा

पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रीतम यांचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तरात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे पंकजा आणि प्रीतम यांचा कट्टर समर्थक म्हणून आपण राजीनामा दिला असं कायंदे यांनी स्पष्ट केलं.

त्यांनी आपला राजीनामा पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाऊसाहेब रासकर यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

Advertisement

संतापाची लाट

भाजपच्या 11 तालुका अध्यक्षांनंतर आता जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. संतोष हांगे, सारिका राणा डोईफोडे, रामराव खेडकर या जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

यासोबतच स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राणा डोईफोडे यांनीही राजीनामा दिला आहे. या राजीनामा सत्रांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत सदस्यांपासून जिल्हा पदाधिकारी यांच्यात तीव्र नाराजी आहे. पंकजा, प्रीतम मुंडे समर्थकांमध्ये संतापाची लाट आहे.

Advertisement