पुणे – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. नुकतंच संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. एका महिला पत्रकाराने (Women Journalist) विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी ‘तू आधी कुंकू लाव, मग मी तुझाशी बोलतो’ असे वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले. भिडे यांच्या या वक्तव्याची राज्य भर चर्चा रंगली असूनमी अनेक नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया येण्यास सुरुवात केली आहे.

अश्यातच आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, “संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी यापूर्वीही ‘आंबे खाल्याने मुलं होतात’, असं वक्तव्य केलं होतं. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे,” असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, “ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे. महिला आयोगाच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करते.

तसेच, संभाजी भिडेंना (Sambhaji Bhide) महिला आयोगाच्या वतीने नोटीस पाठवण्यात येईल. त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा,” असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

संभाजी भिंडे काय म्हणाले होते…

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,”

यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं आहे.