मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे स्मारक (Monument) अरबी समुद्रात (Arabian Sea) होणार आहे. गेली काही दिवस याचे काम बंद आहे. यातच आता संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात होणाऱ्या स्मारकाला विरोध केला आहे.

संभाजी ब्रिगेडने अरबी समुद्रातल्या होणाऱ्या स्मारकाला विरोध करून त्याऐवजी मुंबईतील राजभवनाच्या जागेवर स्मारक बनवण्याची मागणी केली आहे.

जिजाऊ जन्मोत्सवाच्या (Jijau Birth Anniversary) पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचे पूजन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

Advertisement

मुंबईत (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक होणार आहे. यातच आता संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध केला आहे. मुंबईतील राजभवनाच्या (Raj Bhavan) जागेवर हे भव्य स्मारक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राजभवनाच्या जागेवर स्मारक बनवण्यात येण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून राज्यभर मोहीम राबवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्यक्रते 19 फेब्रुवारीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

या भेटीमध्ये ते त्यांची भूमिका मांडणार आहेत. जर राजभवनाची जागा उपलब्ध करून दिली तर संभाजी ब्रिगेड राज्यभरातील गावागावात जाऊन निरूढी गोळा करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडने दिली आहे.

Advertisement