जुन्नर : शिवजयंतीच्या (Shiva Jayanti) निमित्ताने संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosle) यांनी सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच याप्रसंगी त्यांनी तरुणांना मोलाचा सल्ला देखील दिलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज महाराष्ट्रतच (Maharashtra) नव्हे तर देशभरात शिवभक्त शिवजयंती सोहळा साजरा करत आहेत. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाचा उत्साह देशभरातून ओसंडून वाहत आहे.

याप्रसंगी संभाजीराजे भोसले म्हणाले की, शिवाजी महाराज हे सर्वांसाठी आदर्श आहेत. असा जगात कुठलाच राजा झाला नाही की ३०० वर्षांनंतरही सर्व जण प्रेरणा शिवभक्त घेऊन जातात.

Advertisement

माझी शिवभक्तांना विनंती एकच राहील. नुसता जयजयकार करून चालणार नाही. पण शिवाजी महाराजांचा आचार-विचार, त्यांचं आत्मचिंतन करून आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसे पुढे जाऊ शकतो, या दृष्टीकोनातून बघावं असं माझं सगळ्या युवकांना आवाहन आहे’, असं संभाजीराजे भोसले म्हणाले आहेत.

दरम्यान आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. राज्यभर त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात ढोल ताश्यांची गजरात साजरी करण्यात आली आहे. शिवनेरी (Shivneri) गडावर शासकीय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

Advertisement

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,(Ajit Pawar) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.