कोल्हापूरचं मूक आंदोलन झाल्यानंतर राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर ‘सह्याद्री’वर सुमारे तीन तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये सकारात्मक तोडगे निघाले आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला २१ दिवसांचा कालावधी हवाय.

आम्ही म्हणतो, की एक महिना घ्या मात्र, या मागण्या तडीस लावा; मात्र या दरम्यान आंदोलन स्थगित झालेले नाही. ते सुरूच राहील, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला.

आंदोलनामागची भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण नाकारल्यानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे.

Advertisement

कोल्हापूर येथे मूक मोर्चा पार पडल्यानंतर आज नाशिकमध्ये रावसाहेब थोरात सभागृह गवळी मैदानावर मूक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलनकर्त्यांची भूमिका स्पष्ट करुन सांगितली.

आंदोलन सुरूच राहणार

आंदोलन थांबवलं नाहीये, ते सुरूच राहील. जोवर मागण्या मान्य होत नाहीत, तोवर आमच्या बैठका सुरुच राहीतल, असे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Advertisement