महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊनही नोक-या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांत संताप आहे. त्यातच एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानं त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने जागे झालेल्या राज्य सरकारने १५ हजार ५१५ जागा तातडीने भरण्यास मान्यता दिली आहे.

आरक्षणानुसार पदे भरणार

पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊनही नोकरी न लागल्याने आत्महत्या केली. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व जागा तत्काळ भरण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व जागा भरणार असल्याची घोषणा केली.

Advertisement

राज्य लोकसेवा आयोगाकडून सुमारे १५ हजार ५१५ रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आरक्षणानुसार ही पदे भरली जातील. या निर्णयांवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.

प्रक्रिया लवकरच सुरू होणार

कोरोनामुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या जागा भरल्या गेल्या नव्हता; पण आता या जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Advertisement

स्वप्नील याच्या आत्महत्येने सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या मुद्द्यावर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली.