पुणे – तुम्ही चीज सँडविच, कांदा सँडविच आणि इतर अनेक प्रकारचे सँडविच (Sandwich) खाल्ले असतील. पण तुम्ही दही-बटाटा सँडविच (Dahi Aloo Sandwich) कधी टेस्ट केलं आहे का? दही-बटाटा सँडविच (Dahi Aloo Sandwich) खायला चविष्ट आहे आणि तुम्ही ते अगदी कमी वेळात तयार करू शकता. नाश्त्यात काही वेगळे खायचे असेल तर दही-बटाटा सँडविच (Dahi Aloo Sandwich) बनवून खाऊ शकता. तुम्हाला ते बनवायला जास्त वेळ लागणार नाही, चला जाणून घेऊया दही-बटाटा सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.

दही-बटाटा सँडविचसाठी (Dahi Aloo Sandwich) लागणारे साहित्य :

  • 8 ब्रेडचे तुकडे
  • 4 उकडलेले बटाटे
  • 1 कप दही
  • 1/2 सिमला मिरची (चिरलेली)
  • 1/4 चमचा काळी मिरी पावडर
  • 1/4 चमचा चाट मसाला
  • 1/4 चमचा लाल तिखट
  • 1/4 चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार लोणी

दही-बटाटा सँडविच बनवण्याची कृती :

– सर्व प्रथम एका भांड्यात बटाटे मॅश करा.

– त्यात सिमला मिरची, काळी मिरी पावडर, चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि दही एकत्र करून

– मिश्रण तयार करा आणि चांगले मिसळा.

– तव्यावर मध्यम आचेवर बटर लावून गरम करायला ठेवा.

– आता ब्रेड ठेवा आणि दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी होईपर्यंत बेक करा.

– त्याचप्रमाणे सर्व सँडविच तयार करा.

– दही-बटाटा सँडविच तयार आहे. गरमागरम सॉसबरोबर सर्व्ह करा.