पुणे – पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काँग्रेसचे (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर असा या यात्रेचा मार्गक्रमण असून काल या यात्रेचा 31वा दिवस होता. काल राहुल गांधी यांनी कर्नाटकातील तुरुवेक्रे येथे माध्यमांशी संवाद संवाद साधला. यावेळी त्यांनी आरएसएस (RSS) आणि वीर सावरकर (Veer Sawarkar) यांच्यावर निशाना साधला.

‘मला वाटते की आरएसएस इंग्रजांना मदत करत होती आणि सावरकरांना इंग्रजांकडून मानधन मिळत होते, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली होती. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मनसेने देखील या वादात उडी घेतली आहे.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील भाजप आणि मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे मनसेही आक्रमक झाली आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मात्र मनसेची खिल्ली उडवली आहे. हा प्रसिद्धी मिळवण्याचा राजकीय उद्योग असल्याचं संजय राऊत (Sanjay raut) यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. मनसेने राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही ठिकाणी तक्रारीही नोंदविल्या आहेत. त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? असा सवाल राऊत यांना करण्यात आला.

मला त्यावर काही बोलायचं नाही. आपल्या देशात तक्रारी दाखल करणं आणि तक्रारीच्या आधारे प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग झालाय. आमच्याकडचे लोकं अनेकदा त्याचे राजकीय बळी ठरले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रात आहेत. नांदेड हिंगोलीनंतर आता आज राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा होणार आहे.

शेगावमधील सभेतही राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीच्या मुद्द्यावरुन आता सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.