पुणे – काल (दि. 27 जुलै) बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून, राज्यातील अनेक सामान्य नागरिकांनी आणि राजकीय नेत्यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियामार्फत उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी जन्मदिनाच्या शुभेच्छा देत एक ट्वीट केले होते.

मात्र, आता त्यांच्या या ट्विटवरून नवीन वादाला तोंड फुटल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंचा (uddhav thackeray) उल्लेख ‘माजी मुख्यमंत्री’ असा केला असून,

उद्धव ठाकरेंचा ‘पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अनेकांनी यावर आपले मत देखील व्यक्त केलं आहे.

त्यासंदर्भात आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे आणि फडणवीसांना टोला लगावला आहे. ‘पक्षप्रमुख’ उल्लेख टाळणे हा कद्रुपणा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा ‘पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळणे हा दोघांचाही कद्रुपणा आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे सर्वोच्च नेते आहेत. मात्र, त्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी द्वेष आहे.

मात्र, हा द्वेष राज्याच्या आणि शिवसैनिकांच्या मनात नाही. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला गेला.

शिवसेना काय आहे आणि कोणाबरोबर आहे, हे आता महाराष्ट्राला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut)यांनी दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

तर दुसरीकडे. याबाबत बंडखोर शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी ‘मी एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छांवर काहीही बोलू शकत नाही’, असं मत व्यक्त केलं होते.