मुंबई : शिवसेनचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्ली मध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोवा निवडणूक (Goa Assembly Election 2022 ), नितेश राणेंच्या (Nitesh rane) अटकेविषयी, आणि ईडीच्या (ED) कारवाया आणि परमबीर सिंग यांच्याविषयी भाष्य केले आहे.

संजय राऊत यांना गोव्यातील निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे पक्षांतर केलेल्या आमदारांना काय म्हणायचे याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली आहे.

आप पक्षाने गोव्यात (GOA election) उमेदवारांना शपथ दिली आहे त्याबद्दल पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारले असता राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणाले होते पक्षांतर करणाऱ्या आमदारांना रस्त्यात तुडवा. असे सांगितले आहे.

Advertisement

ते जरी कायद्याच्या कसोटीवर बरोबर वाटत नसेल तरी एका पक्षातून निवडून येणे आणि दुसऱ्या पक्षात जायचे असे होत असेल तर जनतेचा विश्वासघात होतो. त्यामुळे गोव्यात जाऊन जनेतेचे प्रबोधन करत आहोत असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

ईडीच्या कारवाई विषयी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, या सरकारमध्ये राजकीय विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई केली जाते. आम्ही त्या सहन करु.

त्यांना सर्च करु द्या, मी त्यांना विचारतोय कुछ मिला क्या? हा सर्व खेळ सुरु आहे. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Advertisement

परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविषयी बोलताना राऊत म्हणाले, परमबीर सिंग हे आरोपी आहेत. मनसुख हिरेन प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप आहेत माहिती नाही. पण ते आरोपी आहेत.

ते मुख्यमंत्री यांचे नाव घेत असतील तर घेऊद्यात, आम्ही देखील काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतो. देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतले जायचे. नितेश राणे प्रकरणी बोलताना आम्ही सर्वजण लॉमेकर्स आहोत.

कुणी खासदार कुणी आमदार आहेत. न्यायालयीन लढाई सुरु आहे. ते न्यायालयीन लढत आहेत, महाराष्ट्र हे कायद्याने चालणार राज्य आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

Advertisement